अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजितदादा पवार , मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज विधानभवन, नागपूर येथे महामंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष लोगोचे अनावरण करण्यात आले.