पुण्यात ‘शांतता पुणेकर वाचत आहेत!’ हा अभिनव उपक्रम… चंद्रकांत पाटील यांनी जागृक पुणेकर आणि वाचनप्रेमी असल्याने या उपक्रमात थेट नागपूरहून घेतला सहभाग

पुणे : विविधतेने नटलेले पुणे शहर वाचनप्रेमींचे शहर आहे. पुण्याच्या समृद्ध वाचनसंस्कृतीला पुढे नेण्याचे माेठे कार्य १६ ते २४ डिसेंबर २०२३ या काळात होणार आहे. अर्थात, नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) यांच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरचा पुणे पुस्तक महोत्सव १६ डिसेंबरपासून पुण्यात सुरू होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ‘एनबीटी’ची भारतीय भाषांमधील शेकडो पुस्तके प्रदर्शनात असतीलच; याशिवाय महाराष्ट्रातील पुस्तक प्रकाशक त्यांच्या पुस्तकांना घेऊन पुण्यात येत आहेत.
पाटील यांनी पुढे म्हटले कि, या पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगाने एक विश्वविक्रम देखील होत आहे. तो म्हणजे वाचनाचा! आज १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत ‘शांतता पुणेकर वाचत आहेत!’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत १४ डिसेंबर रोजी तासभर सारे पुणे जिथे असतील तिथे एक तास आपल्या आवडीची पुस्तकाचे वाचणार आहेत.
ज्ञानार्जनाचे सगळ्यात सशक्त माध्यम म्हणजे पुस्तकं! आज १४ डिसेंबर, संपूर्ण पुणे शहर आज पुस्तक वाचनात आपला वेळ व्यतीत करत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील फिरते पुस्तक घर उपक्रम देखील यात सहभागी होत असून शिवतीर्थानगर मध्ये भाजपा कोथरूड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या नेतृत्वात अनेक पुणेकर पुस्तक वाचनात मग्न आहेत.
पाटील म्हणाले कि मी देखील जागृक पुणेकर आणि वाचनप्रेमी असल्याने या उपक्रमात सहभागी झालो. आपल्याला तर माहितीच आहे, सध्या महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. पण पुणेकर म्हणून मी माझे दायित्व पार पाडले आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ल्यांची महती सांगणारे महेश तेंडुलकर यांचे शिवकालीन दुर्ग व दुर्गव्यवस्था हे पुस्तक वाचताना, शिवरायांच्या दुर्ग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन मिळाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!