पुणे : पुण्याचे वैभव टिकवण्यासाठी हरित आणि प्रदूषणमुक्त व स्वच्छ पुण्याचा संकल्प करत आपल्या पुणे शहराला जागतिक पातळीवरील शहर म्हणून ओळख मिळवून देण्याच्या निश्चयाने जगदीश मुळीक फाऊंडेशनच्या वतीने आज ‘पुणे-थॉन २०२३’चे आयोजन करण्यात आले होते. या पुणे थॉनमध्ये हजारोंच्या संख्येने पुणेकर सहभागी झाले होते. पुणेकरांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळी या पुणे थॉनला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, पुणे ही राज्याच्या सांस्कृतिक राजधानीसह क्रीडाप्रेमी आणि आपल्या आरोग्याची नेहमीच काळजी घेणाऱ्या हेल्थ काँशिअस शहर म्हणून ही ओळखले जाते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात विविध संस्थांद्वारे मॉरथॉनचे आयोजन केले जाते. यात हजारो तरुण -तरुणी, अबालवृद्ध सारेच सहभागी होत असतात. पुणे हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले शहर असल्याने येथे चहुबाजूंनी निसर्गाची मुक्त उधळण होत असते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी फ्लॅग ऑफ करुन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सहभागी स्पर्धकांचा उत्साह वाढवला. त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या लहान मुलांसोबत संवाद देखील साधला. जगदीश मुळीक फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छ, हरित प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी पुण्याचा संकल्प करण्यासाठी ‘RUN FOR PUNE’ या थीमवर आधारित भव्य अशा पुणे थाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. एस. पी कॉलेज ग्राउंडवरून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि यावेळी लाखोंच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली.
Get real time updates directly on you device, subscribe now.