मंदिर समितीचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाकडून 73 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

26

पंढरपूर : आध्यात्मिक राजधानी म्हणून परिचित असणाऱ्या पंढरपूर नगरीत जाऊन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पाटील यांनी मंदिर समितीच्या वतीने शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून केलेल्या सत्काराचा मनोभावे स्वीकार केला.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मंदिर समितीचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाकडून 73 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर झाला असल्याचे सांगितले. यावेळी मंदिरातील पहिल्या टप्प्यातील सुरू असलेल्या प्रस्तावित कामांची पाहणी देखील त्यांनी केली.
याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रणव परिचारक, मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच मोहन डोंगरे यांच्यासह आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.