महिलांना आत्मनिर्भर बनवणारे कांचनताई परुळेकर यांच्या नावाने ‘निरंतर शिक्षण संस्था स्वयंनिर्भरता प्रशिक्षण केंद्र’ सुरु ; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

12

कोल्हापूर : कोल्हापूरात महिला सक्षमीकरणासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कांचनताई परुळेकर यांच्या नावाने आज ‘निरंतर शिक्षण संस्था स्वयंनिर्भरता प्रशिक्षण केंद्र’ सुरु होत असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. यावेळी केंद्राला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

महिलांना केवळ आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. या केंद्रामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

या महत्त्वपूर्ण सोहळ्याला चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा तावडे, स्वानाथ फाउंडेशनच्या संस्थापिका श्रेया भारतीय, सौम्या तिरोडकर, डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनचे विश्वस्त व्ही. बी. पाटील, नगरसेवक शारंगधर देशमुख, तसेच नगरसेविका ऋग्वेदा माने यांच्यासह इतर मान्यवर आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.