दैनिक ” पुढारी”च्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापूर मध्ये आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

13
कोल्हापूर : दैनिक ” पुढारी”च्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापूर मध्ये आयोजित कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
गेल्या ८५ वर्षांपासून वाचकांच्या भावनांशी एकरूप असेलेले दैनिक म्हणजे पुढारी. १ जानेवारी २०२४ रोजी दैनिक पुढारी ८६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्त कोल्हापूरमध्ये भाऊसिंगजी रोडवरील टाऊन हॉल गार्डनमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी दैनिक पुढारी वृत्तपत्र समुहाचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, पुढारी वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष तथा समूह संपादक डॉ. योगेश जाधव, खासदार धनंजय महाडिक, शाहू समूहाचे अध्यक्ष राजे समरजित घाटगे, कोल्हापूर भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे , सत्यजित कदम, कृष्णराज महाडिक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.