सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूर मधील विविध विकासकामांचे लोकार्पण आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्यासाठी सोलापूर – होटगी मार्गावर प्रादेशिक पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, ‘पर्यटन’ केवळ मनोरंजनापर्यंत मर्यादित नसून ते विकासाचे उत्तम माध्यमही आहे. भारतात पर्यटन क्षेत्रांत असंख्य रोजगार उपलब्ध असून देशाच्या अर्थव्यवस्थेतही या क्षेत्राचा मोठा वाटा आहे. याच धर्तीवर पर्यटन क्षेत्रामध्ये सोलापूर जिल्ह्याला अग्रेसर बनविण्यासाठी, येथे पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्यासाठी सोलापूर – होटगी मार्गावर प्रादेशिक पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सदर काम जलदगतीने पूर्ण करावे, अशा सूचना देखील पाटील यांनी संबंधितांना केल्या. यावेळी आ. सुभाषबापू देशमुख यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.