कोल्हापूर : प्रभू श्री. रामचंद्र चराचरात वास करतात. अयोध्येत त्यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून अवघा देश राममय झाला आहे. यानुषंगाने कोल्हापूरमधील दसरा चौकात प्रभू रामचंद्र यांची १०८ फुटांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. या प्रतिमेच्या उद्घाटन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार धनंजय महाडिक आणि कोल्हापुरातील राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२२ जानेवारी रोजी संपूर्ण देश राममय होणार आहे. कोल्हापुरात देखील जय्यत तयारी सुरु आहे. या दिवशी दसरा चौक येथील मैदानात प्रतिकृती नागरिकांना दर्शनासाठी उपलब्ध असेल. या ठिकाणी श्री रामांची १०८ फुटाची भव्य प्रतिमा जी आज उभारण्यात आली आहे ती सर्व नागरिकांना दर्शनासाठी उपलब्ध असेल. त्यावर अक्षता आणि पुष्प अर्पण करण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. चंद्रकांत पाटील यांना या भव्य प्रतिमेचे उदघाटन करण्याचे सौभाग्य मिळाले.