“मंदिर वहीं बनाएंगे” हा कारसेवकांचा संकल्प आज पूर्ण होत आहे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

24
पुणे  : अयोध्येतील भव्य, दिव्य आणि अलौकिक श्री राम मंदिरात आज राम लल्ला विराजमान झाले आहेत. आजचा दिवस असंख्य रामभक्तांच्या तपश्चर्या, समर्पण आणि त्यागाचे फळ आहे. आज ५०० वर्षांचे संघर्ष आणि असंख्य राम भक्त, कारसेवकांच्या योगदाना नंतर अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीराम मोठ्या थाटामाटात विराजमान होत आहेत. आजच्या या पवित्र दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदार संघात विविध ठिकाणी भेटी दिल्या.
आज “मंदिर वहीं बनाएंगे” हा कारसेवकांचा संकल्प पूर्ण होत आहे. या धर्तीवर चंद्रकांत पाटील यांचा कोथरुड मतदारसंघ आज राममय झाला आहे. कोथरुड मधील डहाणूकर कॉलनी आणि ग्रामदैवत म्हातोबा मंदिरात आयोजित कार्यक्रमास पाटील यांनी उपस्थित राहून प्रभू श्रीरामांची मनोभावे पूजा केली. तसेच पाटील यांनी सर्वांना या मंगल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.