के एम चषक फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस समारंभास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

42

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. के एम चषक फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस समारंभास देखील त्यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित राहून पाटील यांनी सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले.

शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाला यंदा 111 वर्षे पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून युथ आयकॉन श्री. कृष्णराज महाडिक व खंडोबा तालीम मंडळ यांच्या पुढाकाराने ‘केएम चषक’ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना शिवाजी तरुण मंडळ व खंडोबा तालीम मंडळ यांच्यामध्ये झाला. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पर्धेदरम्यान जिद्द, चिकाटी, मेहनत यांचे प्रदर्शन करून उपविजेता ठरलेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून क्रीडा क्षेत्रातील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विजेत्या शिवाजी तरुण मंडळाला दोन लाख रुपये व चषक, उपविजेत्या खंडोबा तालीम मंडळाला एक लाख रुपये व चषक तसेच वैयक्तिक खेळाडूंनाही बक्षिसे देण्यात आली. तसेच महिला प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने पैठणी साडी बक्षीस देण्यात आली.
यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती व युथ आयकॉन कृष्णराज महाडिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.