उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील श्रीशंकरांचे दर्शन घेत केले प्रसादाचे वाटप
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी महाशिवरात्रीनिमित्त त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. महाशिवरात्रीनिमित्त कोथरूड मतदारसंघातील सुतारवाडीतील मंदिरात पाटील यांनी श्रीशंकरांचे दर्शन घेतले. सर्वांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी लाभो, भगवान महादेवांची कृपादृष्टी सर्वांवर राहो, अशी मनोभावे प्रार्थनाही केली. शक्तीचा उत्सव असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरात चंद्रकांत पाटील यांनी प्रसाद वाटप देखील केले. मनात एक अनामिक ऊर्जा निर्माण झाल्याची अनुभूतीही लाभली असल्याचे पाटील यांनी म्हटले.