अकोला : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अकोला दौऱ्यादरम्यान ‘महाविजय 2024’ मोहिमेचा शुभारंभ केला. पाटील यांनी अकोल्यात भाजपच्या वेगवेगळ्या कार्यालयांना भेटी दिल्या. कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला. या दौऱ्यादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या जिल्हा बैठकीस उपस्थिती लावली. यासोबतच जिल्हा बैठकीत जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स असोसिएशन, विधी सेल आणि शैक्षणिक संस्था चालक यांच्या समवेत संवाद देखील साधला.
चंद्रकांत पाटील यांची अकोला जिल्हा दौऱ्यादरम्यान मराठा मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी म्हटले कि, भारतीय जनता पार्टी राष्ट्र उन्नतीचे ध्येय उराशी बाळगून कार्य करते आहे. पक्षाच्या ध्येय-धोरणांवर विश्वास ठेवून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये जनेतेने भाजपाला कौल द्यावा, असे आवाहन त्यांनी प्रसंगी केले.
या जिल्हा बैठकीत जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स असोसिएशन, विधी सेल आणि शैक्षणिक संस्था चालक यांच्या समवेत देखील पाटील यांनी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देशात प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीला चालना मिळाली आहे. याच धर्तीवर लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीला सत्तेत अण्ण्यासाठी सर्वोतोपरी योगदान देण्याचे आवाहन पाटील यांनी केले.