पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील विविध मतदारसंघात त्यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान पाटील यांनी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कैंटोनमेंट बोर्डमधील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्या पासून देशाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने देशाच्या विकासाला लाभलेली गती अखंडित ठेवण्यासाठी तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर उपस्थित होत्या.