कोथरूड माझे कुटुंब असून या कुटुंबातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे माझे कर्तव्य समजतो – मंत्री चंद्रकांत पाटील

22

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेला सदैव तत्पर असतात. कोथरूड मधील नागरिकांना अनेक सोयी सुविधा त्यांनी पुरवल्या आहेत. कोथरूड आपले कुटुंब असल्याचे पाटील यांनी म्हटले. आज पुणे दौऱ्यावर असताना पाटील यांनी कोथरूडमधील काही कुटुंबियांना भेटी देत त्यांच्याशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशालाच आपले कुटुंब मानतात. त्याचप्रमाणे कोथरूडही माझे कुटुंब असून इथला प्रत्येक नागरिक माझ्याच कुटुंबातील सदस्य, असल्याचे मी मानतो. माझ्या कुटुंबातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे माझे कर्तव्य समजतो असे पाटील यांनी म्हटले. त्यानुसार कोथरूडमधील प्रीतमनगरमधील (प्रभाग क्रमांक १३) बूथप्रमुख संदीप देशमुख, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक आणि कर्वेनगरमधील रहिवासी राजाभाऊ कापसे, मयूर कॉलनीतील दिलीप नगरकर, शिवतीर्थ नगरमधील भाजपा सुपर वॉरियर्स सुरेखा जगताप, गाढवे कॉलनीतील संदीपनाना कुंबरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पाटील यांनी अनेक विषयांवर दिलखुलास संवाद देखील साधला.

Get real time updates directly on you device, subscribe now.