पुणे : पुणे शहर कार्यालयात शुक्रवारी दिवसभर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थतीत विविध आघाड्या आणि मोर्चा यांच्या बैठका पार पडल्या. पुणे शहर व्यापारी आघाडीची बैठकही दुपारी शहर कार्यालयात झाली. या बैठकीमध्ये पुढील काळातील लोकसभा निवडणुकीचे नियोजन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज भाजपा पुणे शहर व्यापारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी पाटील यांनी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले व्यापाऱ्यांचा सर्वसामान्य नागरिकांशी थेट संबंध येतो. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन या प्रसंगी पाटील यांनी केले.
या वेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले, शहराचे सरचिटणीस रवी साळेगावकर, पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, भाजपा व्यापारी आघाडीचे उमेश शाह, प्रतिक देसरडा, कौस्तुभ दबडगे यांच्यासह व्यापारी आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. .
Get real time updates directly on you device, subscribe now.