शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची समन्वय बैठक संपन्न

4
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची समन्वय बैठक संपन्न झाली.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे पाटील यांनी आवाहन केले.

या वेळी मंत्रिमंडळातील उदय सामंत, विधिमंडळातील सहकारी दिलीप मोहिते पाटील, चेतन तुपे, अतुल बेनके, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय माशिलकर, उपनेते इरफान सय्यद, किरण साळी, माजी आ. शरद सोनावणे, विलास लांडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे, शिरूर, बारामती, लोकसभा क्लस्टरचे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, भाजपा उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपा पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष शंकरभाऊ जगताप, पिपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, आर पी आय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार, रासपचे शिवाजी कुऱ्हाडे, शिवसंग्रामचे संदेश बारवे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (जोगेंद्र कवाडे गट) प्रकाश भालेराव, लोकजनशक्ती पक्षाचे संजय आल्हाट, जनता दल सेक्युलरचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे तसेच प्रहार संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, महाराष्ट्र क्रांती सेना, लहुजी सेना, लहुजी शक्ती सेना आदी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.