डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य चिरंतन सुरू राहो – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघात ठिकठिकाणी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळांना भेटी देऊन, सर्वांना भीम जयंतीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण जगात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी होत असते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच समाज सुधारणेसाठीही बहुमोल योगदान दिले . त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते. ते आपल्या कार्यातूनच नव्हे तर विचारांनी देखील अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत, ज्यातून सर्वांना प्रेरणा मिळते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी कोथरुड मतदारसंघात ठिकठिकाणी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळांना भेटी देऊन, सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रचार आणि प्रसाराचे कार्य चिरंतन सुरू राहो, अशी सदिच्छाही यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!