कोथरूडमधून जास्तीत जास्त मताधिक्य देत मुरलीधर मोहोळ यांना विजयी करून मोदीजींचे हात बळकट करूया, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशात सर्वत्र प्रचाराचे वारे वाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मॉर्निंग वॉक करताना कोथरूडमधील थोरात उद्यानात आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला.
पाटील यावेळी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करतो आहे. विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी भाजपाला मतदान करून मोदीजींना पाठिंबा दर्शवावा. मोहोळ यांना मत म्हणजे मोदीजींनाच मत! त्यामुळे कोथरूडमधून जास्तीत जास्त मताधिक्य देत मोहोळ यांना विजयी करून मोदीजींचे हात बळकट करूया, असे आवाहन या प्रसंगी पाटील यांनी केले.
संवादादरम्यान चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघालाही भेट दिली. यावेळी संघाचे पदाधिकारी आणि सदस्यांशी संवाद साधत संघाकडून स्वागतपर सन्मान आणि शुभेच्छा स्विकारल्या. यावेळी डॅा. संदीप बुटाला, महेश वाबळे, आनंद रिठे, दिलीप वेडे-पाटील, हरिदास चरवड, जयंत भावे, दिपक पोटे, मंजुश्री खर्डेकर, हर्षाली माथवड, वासंती जाधव, श्याम देशपांडे, नवनाथ जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.