चंद्रकांत पाटील यांनी करवीर तालुक्यातील वाशी येथे भीमजयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत सहभागी होऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले

7
कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान करवीर तालुक्यातील वाशी येथे भीमजयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत सहभागी होऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जयंती उत्सवात सहभागी झालेल्या सर्वांना भीमजयंतीच्या शुभेच्छाही दिल्या. या वेळी भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख, मुंबईस्थित युवा उद्योजक गणपतराव तिबिले, शामराव तिबिले, जयवंत तिबिले, आरपीआय आठवले गटाचे करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाशीकर, सौरभ कांबळे, ग्रा. पं. सदस्य श्रीधर कांबळे, बाबासाहेब कांबळे, सर्जेराव जाधव, प्रदीप कांबळे, कपिल कांबळे, वैभव कांबळे, शुभम वाशीकर, अजित कांबळे, सुरेश सावंत आदीही उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.