महायुतीतील सर्व घटक पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी समन्वय साधत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे, सांगलीत चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

सांगली :  हातकणंगले लोकसभेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सदाभाऊ खोत यांच्या पुढाकाराने शिराळा विधानसभा मतदार संघामध्ये रयत क्रांती संघटनेकडून शिराळा विधानसभा मतदार संघाचा मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
महायुतीतील सर्व घटक पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांनी समन्वय साधत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे. त्यासाठी सर्वांनीच योगदान द्यावे, असे आवाहन याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी केले.
यावेळी या सभेस सुरेश हळवणकर, सत्यजित भाऊ देशमुख, सम्राटबाबा महाडिक, जयराज पाटील, सागर खोत, अमोल पाटील, किरण उतळे, डि.के पाटील नंदकुमार पाटील, बजरंग भोसले, लालासो धुमाळ,सुहास पाटील व रयत क्रांती संघटनेचे शिराळा विधानसभेतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!