नियोजनात्मक प्रचारातून विकास कामाची शिदोरी घेवून कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहचावे – चंद्रकांत पाटील
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज येथे आयोजित “मिसळ पे चर्चा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात सहभाग घेऊन पाटील यांनी मिसळीचा आस्वाद घेतला.