सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लोकसभेच्या माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ बोरगाव मध्ये १४ गावांतील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
रणजितसिंह नाईक यांची लोकप्रियता पाहता माढ्यातून त्यांचा विजय पक्का आहे, असा विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले. त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन संपर्क साधावा, अधिकाधिक मते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पाटील यांनी केले.