सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोकसभेच्या माढा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नातेपुते येथे आयोजित महायुतीच्या बैठकीस हजेरी लावली.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या खंबीर नेतृत्वामुळे देशात वर्षोनुवर्षे प्रलंबित असणारे अनेक विषय मार्गी लागले आहेत. हजारो वर्षांच्या संघर्षानंतरही अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर होत नव्हते. मात्र मोदीजींमुळे या मंदिराचे काम पूर्ण होऊन रामलल्ला विराजमानही झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यामुळे इथे विकासाची गंगा प्रवाही झाली आहे. देशात असे एक ना अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे, मा. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन या प्रसंगी केले.