सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी उदय शंकर पाटील यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उदय पाटील याच्यासोबत अनेक विषयांवर अनौपचारिक संवाद साधला. या वेळी अविनाश मागावकर, मोहन डांगरे, राहुल डांगरे, गिरीश किवडे, सुधीर तमशेट्टी, प्रशांत पाटील, नितीन शिवशरण, दीपक काटकर, सोमो पाटील, नीळकंठ भोगडे, भारत काळे, दयानंद भोगडे आदी उपस्थित होते.