सोलापूर : लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरमधील प्रभाग क्रमांक १७ येथील नागरिकांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दहा वर्षांत सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. याचा लाभ देशभरातील कोट्यवधी नागरिकांना होतो आहे. त्यामुळे मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन या प्रसंगी पाटील यांनी केले.
या वेळी मनीष काळजे, घनश्याम शिवसिंगवाले, रवी कैय्यावाले, जुगनताई अंबेवाले, माणिकसिंग अंबेवाले, बन्सिसिंग कैय्यावाले, समशेर अंबेवाले, माणिकसिंग अंबेवाले, सुमित मनसावाले, अर्जुन शिवसिंगवाले, गुलजार शिवसिंगवाले, गणेश बुऱ्हाणबाले यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.