विकासाची ओढ असलेले सातारकर यावेळीही सर्वांगीण विकासाचा विश्वास देणाऱ्या भाजपा महायुतीला विजयी करतील असा ठाम विश्वास – चंद्रकांत पाटील

सातारा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विजय काटवटे आणि नगरवाचनालयाचे संचालक प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
चंद्रकांत पाटील यांनी सातारा दौऱ्यादरम्यान विजय काटवटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देवून निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीस हजेरी लावली. यावेळी त्यांनी मंगळवार पेठ परिसरातील कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधला.
दरम्यान पाटील यांनी नगरवाचनालयाचे संचालक प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी परिसरातील नागरिकांशी हितगुज केले. दरम्यान, भाजपा सरकारच्या कार्यकाळात देशातील जनतेच्या विकासला गती प्राप्त झाली असून त्यांना अनेक महत्त्वपूर्ण सुविधांचा लाभ घेता येत आहे याबाबत समाधान व्यक्त केले. याच धर्तीवर विकासाची ओढ असलेले सातारकर यावेळीही सर्वांगीण विकासाचा विश्वास देणाऱ्या भाजपा महायुतीला विजयी करतील असा ठाम विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!