विश्वास गांगुर्डे यांच्या निधनाने पुण्यनगरीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कृतीशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

7

पुणे : पर्वती मतदासंघातील भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन.  वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विश्वास गांगुर्डे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते. विश्वास गांगुर्डे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

पाटील म्हणाले, विश्वास गांगुर्डे म्हणजे आदर्श आणि लोकाभिमुख लोकप्रतिनिधी कसा असावा याचे ते उदाहरण होते. त्यांच्या निधनाने पुण्यनगरीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या कृतीशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत. त्यांच्या स्मृती सदैव सोबत राहतील. गांगुर्डे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो,अशी प्रार्थना पाटील यांनी केली.
पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर १९९९ ला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढली होती. पर्वती विधानसभेतून ते आमदार झाले होते. त्यांचे पार्थिव आज सकाळी १० वाजता निवासस्थानी आणण्यात आले. आज दुपारी १२ वाजता त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.