सातारा जिल्हा दौऱ्यादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते दिवंगत प्रतापराव भोसले यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

45

सातारा : भाजपा नेते मदनदादा भोसले यांचे वडिल, ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सातारा जिल्हा दौऱ्यादरम्यान भोसले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

चंद्रकांत पाटील आज सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मदनदादा भोसले यांच्या कुटुंबियांच्या घरी भेट दिली. मदनदादा भोसले यांचे वडील ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे दिनांक १९ मे रोजी निधन झाले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसोबत त्यांनी काम केले होते. कॅबिनेटमध्ये अनेक मंत्रिपद भूषवली. ते काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. कमी वयात आमदार होण्याचा मान प्रतापराव भोसले यांनी मिळवला होता. प्रतापराव भोसले यांच्या पश्चात माजी आमदार मदन भोसले, मोहनराव भोसले, गजानन भोसले हे तीन सुपुत्र, विवाहित कन्या पद्मादेवी पाटील, सूना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.