महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या आव्हाडांचा भाजपाकडून निषेध..

17

पिंपरी – आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव, भारतरत्न व भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडून त्यांचा अवमान केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाडच्या फोटोला जोडे मारण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळे येथे अस्पृश्यते विरोधात सत्याग्रह आंदोलन केले होते. जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने बाबासाहेबांनी हे आंदोलन केले. या महामानवाचा अवमान करण्याचे पाप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले असल्याचे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर मनुस्मृतीच्या ग्रंथाचे दहन करताना भारतरत्न आणि संविधानाचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडून आपल्या बाबासाहेबांचा अवमान केला. बाबासाहेब हे प्रत्येक भारतीयांचे आदर्श आहेत. आदर्श महापुरुषाचा हा अवमान आम्ही कदापिही खपवून घेणार नाही असे प्रतिपादन शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी यावेळी केले.

या कृत्यावरून आव्हाडच्या मनात परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून येते. स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि असे कृत्य करायचे हे शोभनीय नाही. यानिमित्ताने त्याचा खरा चेहरा समोर आला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध केला आहे. आव्हाड यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे यावेळी त्यांनी यावेळी जाहीर केले.

या आंदोलनास प्रदेश उपाध्यक्ष अमरजी साबळे, दक्षिण आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले,भाजपा प्रदेश सदस्य माऊली थोरात, सरचिटणीस संजय मंगोडेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सौ. शैला मोळक, अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्ष भीमा बोबडे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.सुजाताताई पालांडे, माजी महापौर आर.एस.कुमार,यांच्यासह विविध आघाडयांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.