श्रीविठ्ठलाची कृपा सदैव महाराष्ट्रावर राहो, सर्वांना सुख, समृध्दी आणि आरोग्य लाभो, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची विठुरायाचरणी प्रार्थना
पंढरपूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पंढरपूर येथे श्रीविठुराया आणि रखुमाईचे सपत्नीक दर्शन घेतले. श्रीविठ्ठलाची कृपा सदैव महाराष्ट्रावर राहो, सर्वांना सुख, समृध्दी आणि आरोग्य लाभो अशी प्रार्थना विठुरायाचरणी केली. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि शासनाने जो ७५ कोटींचा निधी दिला होता त्याच्या माध्यमातून या मंदिराचं जे काम सुरु होत ते काम अतिशय सुंदर झालेलं आहे. ते काम सुरु असताना रोज सकाळी ११ वाजेपर्यंतच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं देवाचं दर्शन व्हायचं. ११ नंतर दर्शन बंद व्हायचं. आज दोन महिन्यांनी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे. जतन व संवर्धनाच्या कामामुळे मंदिर अडीच महिने बंद होते. मात्र, आजपासून पंढरपूरचे श्रीविठ्ठल मंदिर भक्तांसाठी पूर्ववत खुले करण्यात आले आहे. आज संवर्धनाच्या कामानंतर श्रीविठुराया आणि रखुमाईच्या मनमोहक रूपाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याने अतीव आनंद झाला असल्याचे पाटील यांनी म्हटले. आज दोन महिन्यानंतर त्याची जी पूजा असते ती पूजा पालकमंत्री या नात्याने पाटील यांनी करावी असा इथल्या ट्रस्टींचा आग्रह होता. जेव्हा जेव्हा पहाटेच्या पूजेचा मला मान मिळतो तेव्हा तेव्हा मला अतिशय आनंद होतो , असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील पुहे म्हणाले कि, यावेळी येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यामुळे एकदा नियमित पाऊस सुरु व्हावा. पीक चांगलं यावं. यावेळी पाऊस खूप चांगला असेल, समाधानकारक असेल, असे अनेक तज्ज्ञ सांगत आहेत. तसेच व्हावं असं मागणं पाटील यांनी विठुरायाकडे मागितले. पाऊस चांगला झाल्याशिवाय पिकं चांगली येणार नाहीत. शेतकरी संपन्न झाला तरच देश संपंन्न होईल हि प्रार्थना केली असे पाटील यांनी सांगितले.