सुजाता सौनिक आपल्या अविरत सेवेच्या प्रशासकीय अनुभवातून आपल्यावर सोपविलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडतील असा ठाम विश्वास – चंद्रकांत पाटील

25

मुंबई : वरीष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या अविरत सेवेच्या प्रशासकीय अनुभवातून आपल्यावर सोपविलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडाल असा ठाम विश्वास वाटत असल्याचे पाटील म्हणाले.

राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात तसेच सदरचा पदभार स्वीकारून महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सुजाता सौनिक यांना पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळाला आहे. अत्यंत कडक शिस्तीसाठी आणि नियम व चौकटीतच काम करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सौनिक या राज्याच्या ४५ व्या मुख्य सचिव ठरल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांनी सौनिक यांचे अभिनंदन करत म्हटले कि, आपल्या अविरत सेवेच्या प्रशासकीय अनुभवातून आपल्यावर सोपविलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडाल असा ठाम विश्वास वाटतो.
सुजाता सौनिक या वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्या जून २०२५ मध्ये निवृत्त होणार आहेत. त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे चंदीगडमध्ये झाले. नंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. रविवारी सायंकाळी त्यांनी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.

Get real time updates directly on you device, subscribe now.