ऋतुजा धुमाळ या विद्यार्थिनीने वस्तीत राहून अतिशय बिकट परिस्थितीत दहावीत मिळवले सुयश… तिच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी मदत – चंद्रकांत पाटील

8
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात भेट दिली. यावेळी मंगळवार पेठेतील वस्तीत राहणाऱ्या ऋतुजा संजय धुमाळ या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेत सुयश मिळाल्याबद्दल पाटील यांनी तिचे अभिनंदन केले.
पुण्यातील मंगळवार पेठे या वस्तीत राहणाऱ्या ऋतुजा संजय धुमाळ या विद्यार्थिनीने परिस्थिती विपरीत असूनही अभ्यास करत दहावीच्या परीक्षेत सुयश मिळवले आहे. या यशाबद्दल क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे ऋतुजा धुमाळ हिचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ऋतुजाच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.
या वेळी मुरलीधर मोहोळ, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, भाजपाच्या ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष सतीश गायकवाड, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, अमोल बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.