भाजपा महाराष्ट्र प्रदेश बैठकीत सर्वानुमते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या अभिनंदनाचा ठराव पारित
मुंबई : दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात भारतीय जनता पार्टीची प्रदेश बैठक घेण्यात आली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दणदणीत विजयाच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी हा प्रस्ताव चर्चेला मांडला. तर खासदारधनंजय महाडिक , महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अनुमोदन दिले. तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रस्तावाचा समारोप केला.
यावेळी बैठकीत सर्वानुमते पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या विजयाच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. तसेच नवनियुक्त खासदार व मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला व प्रमुख नेत्यांनी उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटनमंत्रीशिवप्रकाश, सचिव पंकजा मुंडे , विजया रहाटकर , सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे , केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे , माजी केंद्रीय मंत्री नाराय राणे , खासदार अशोक चव्हाण , सुधीर मुनगंटीवार , माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील , भागवत कराड यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सहकारी, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारीही उपस्थित होते.