वाराणसीत भाजपचा विजयोत्सव; कार्यकर्त्यांच्या जल्लोषात मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी

15

वाराणसी : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या घवघवीत यशाचा जल्लोष उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विजयोत्सवात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.

वाराणसीतील एका मंडलात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी विजयाचा जयघोष करत जल्लोष केला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः या जल्लोषात सामील होऊन कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. देशाच्या विविध भागांत भाजपला मिळत असलेल्या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.

चंद्रकांत पाटील यांनी या यशाचे श्रेय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी, कणखर केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नितीन नबीन आणि भाजपाच्या असंख्य शिलेदारांना दिले. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलल्याचा आनंद अवर्णनीय आहे. आसाम आणि पुदुच्चेरीतही भाजपाची कामगिरी जबरदस्त झाली आहे. तमिळनाडू, केरळमध्ये आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करतो. या यशासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. अपार कष्ट केले आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांचं विशेष अभिनंदन. यापुढेही आपण भाजपाला अधिकाधिक यश मिळण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करू, याची खात्री असल्याचे पाटील यांनी म्हटले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. अनेक वर्षे सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला (TMC) पराभूत करत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. 5 राज्यांपैकी 3 राज्यात भाजप एनडीए यांनी जिंकली आहे. 5 राज्यांचे निकाल लागले असून 3 राज्यांमध्ये सत्तापालट झालं. पश्चिम बंगालसह तामिळनाडू आणि केरळममध्ये सत्तांतर. भाजप पहिल्यांदाच बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार.

Get real time updates directly on you device, subscribe now.