पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात… अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना – चंद्रकांत पाटील

82

पश्चिम बंगाल येथे कांचनगंगा एक्स्प्रेस आणि एका मालगाडीची टक्कर होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे हि घटना घडली. अपघातात कांचनगंगा एक्स्प्रेसचे दोंन डब्बे रुळावरून घसरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) कडून 2 लाख रुपयांची मदत तसेच जखमींना 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, पश्चिम बंगाल येथे कांचनगंगा एक्स्प्रेस आणि एका मालगाडीची टक्कर होऊन झालेल्या जीवितहानीचे वृत्त दुःखद आहे. मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

या ठिकाणी रेस्क्यू टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरु झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनीवैष्णव देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) कडून 2 लाख रुपयांची मदत तसेच जखमींना 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.