विधानसभा 2024 च्या अनुषंगाने भाजपाची काय रणनीती असेल, याबाबत चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात बैठक संपन्न
कोल्हापूर : भाजपा पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व संघटन मंत्री मकरंद देशपांडे आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चंद्रकांत पाटील यांनी संबोधित केले.
विधानसभा 2024 च्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातून भाजपाची काय रणनीती असेल, याबाबत सर्वांना चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. भाजप हि एकमेव पार्टी अशी आहे कि दर तीन वर्षांनी इथे सर्व प्रकारची निवडणूक होते. बूथ प्रमुख असेल, विधानसभेचा प्रमुख, राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक असेल अशा बैठका होत असतात. पश्चिम महाराष्ट्राचे दोन भाग केले. कोल्हापूर, सांगली, सातारा याचे प्रमुख खासदार धनंजय महाडिक आणि उरलेला भाग आहे ज्यामध्ये पुणे, पुणे ग्रामीण आणि सोलापूर शहर आणि ग्रामीण याचा प्रमुख खासदार मुरलीधर मोहोळ ठरले. या दोघांचं प्रमुख म्हणून हि जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर देण्यात आली आहे.
आम्ही ७८ जिल्हे ठरवेल आहेत त्याप्रमाणे ७८ अधिवेशन होतील. किमान ३००० संख्येच अधिवेशन व्हावं असा आग्रह आम्ही धरलेला आहे. लोकसभेत यश थोडं कमी आलं यामधून मनोबल न ढासळता जे प्रत्येक विभागामध्ये निवडून आले अशी एकमेव महायुती आहे ज्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये आम्हाला काही ना काही प्रतिनिधित्व मिळाल, असे पाटील यांनी म्हटले. यावेळी भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.