चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने लाखो रुग्णांना मिळाली संजीवनी… मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून रुग्णांना कोट्यावधींची मदत

16

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील आपल्या कोथरूड मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. यांच्या माध्यमातून कोथरुड मधील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून कोट्यावधींची मदत कोथरुड विधानसभा मतदारसंघातील रुग्णांना झाली आहे.पाटील यांच्या सेवेमुळे कोथरुड मधील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे.

चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघात नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देतात. फिरते वाचनालय, फिरता दवाखाना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून नागरिकांना मदत उपलब्ध करून देणे. राज्यातील एकही सर्वसामान्य व गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मदत गरजू रुग्णांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली जाते. या व्यवस्थेमुळे लाखो रुग्णांना संजीवनी मिळाली असून, कोथरुड विधानसभा मतदारसंघातील गरजू रुग्णांना याचा जास्तीतजास्त लाभ व्हावा; यासाठी पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.‌

चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या कक्षाने वेळोवेळी पाठपुरावा करुन कोथरुड मधील असंख्य रुग्णांवर उपचारासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.‌ या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत चार कोटी ४२ लाख ७० हजार २५० इतका निधी कोथरूड मधील रुग्णांना उपलब्ध झाला असून, दुर्धर आजारावर उपचार करण्यात आले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.