सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संघटनेच्या महाअधिवेशनाची जोरदार तयारी… महाराष्ट्राचे माहिती महासंचालक डॉ.ब्रिजेशसिंह यांना प्रकट मुलाखतीसाठी निमंत्रण

मुंबई : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल २०२५ रोजी भोसले नॉलेज सिटी संकुलात होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे निमंत्रण महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक डॉ. ब्रिजेशसिंह यांना संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतेच दिले.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने व उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांनी डॉ. ब्रिजेशसिंह यांनी महाअधिवेशनात प्रकट मुलाखत द्यावी, अशी विनंती यावेळी त्यांनी केली.
“कृत्रिम बुद्धिमत्ता व आजची पत्रकारिता” या विषयावर प्रस्तावित मुलाखत घेण्याचा मानस असल्याचे डॉ.ब्रिजेशसिंह यांना सांगण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या तयार होत असलेल्या डिजिटल मिडिया धोरणाविषयी चर्चा झाली. धोरणाच्या मसुद्यासाठी विशेष सूचना असतील तर त्या देण्या विषयी त्यांनी सूचित केले. राजा माने यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांच्या अडचणी व संघटनेच्या आजवरच्या वाटचालीबद्दल डॉ. ब्रिजेशसिंह यांना माहिती दिली.
अधिवेशनाचे संयोजन समितीचे प्रमुख म्हणून संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पारकर हे कार्यरत आहेत.अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध व्यापक समित्या गठित होत असून कोकणातील विविध क्षेत्रातील मान्यवर व मंत्र्यांना निमंत्रित केले जाणार आहे.