पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था केवळ वेगाने प्रगती करत नाही, तर जागतिक महासत्ता म्हणून पुढे जात आहे – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

नवी दिल्ली : २०१५ मध्ये २.१ ट्रिलियन डॉलर्स असलेली भारताची GDP पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या आर्थिक ध्येयधोरणांमुळे अवघ्या दहा वर्षांत दुप्पटीने वाढून सुमारे ४.३ ट्रिलियन डॉलर्स इतकी झाली आहे. ही वाढ तब्बल १०५% इतकी आहे, जी जगातील कोणत्याही प्रमुख जागतिक अर्थव्यवस्था असलेल्या देशाला मागे टाकणारी आहे, असे मत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
मोहोळ म्हणाले कि, ही अभूतपूर्व कामगिरी आदरणीय मोदीजींच्या निर्णायक नेतृत्वाची आणि त्यांच्या सरकारच्या प्रभावी आर्थिक धोरणांची साक्ष आहे. गेल्या दशकभरात राबवलेल्या महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांमुळे आणि ‘Ease of Doing Business’ वर दिलेल्या प्राधान्यामुळे भारताने जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
गेल्या दहा वर्षांत आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून स्थानिक उद्योगांना चालना देण्यात आली, उत्पादन क्षेत्राला बळकट करण्यासाठी PLI योजना प्रभावीपणे राबवली गेली, परकीय गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आले, डिजिटल क्रांतीमुळे आर्थिक वृद्धीला नवे आयाम मिळाले आणि इन्फ्रास्ट्रक्चर तसेच लॉजिस्टिक क्षेत्रात ऐतिहासिक गुंतवणूक झाली. या परिवर्तनशील धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था केवळ वेगाने प्रगती करत नाही, तर जागतिक महासत्ता म्हणून पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत’ ही संकल्पाच्या दृष्टीने पडलेले हे दिशादर्शक पाऊल असल्याचे मत मोहोळ यांनी व्यक्त केले.