पहलगामच्या दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल -पंतप्रधान नरेंद्र मोदी

जम्मू काश्मीर : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथून प्रथमच हल्ल्याबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी एक कडक संदेश दिला आहे. ते म्हणाले की पहलगामच्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही. ते मातीत मिसळतील.पंचायत राज दिनानिमित्त बिहारमध्ये विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करताना त्यांनी हे वक्तव्य केले. २२ एप्रिल रोजी प्राण गमावलेल्यांनाही त्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदींनी बिहारच्या विकासाबद्दल आणि महिला सक्षमीकरणाबद्दलही बोलले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी हे स्पष्टपणे सांगेन की ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि ज्यांनी त्यासाठी कट रचला त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. या लोकांना नक्कीच शिक्षा मिळेल. आता दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान मोदींनी बिहारमधील मधुबनी येथून सांगितले की, पहलगाममधील दहशतवाद्यांचा नायनाट केला जाईल.
22 तारखेला दहशतवाद्यांनी पर्यटकांना अत्यंत क्रूरपणे मारलं. त्यामुळे संपूर्ण देश व्यथित आहे. कोटी कोटी देशवासी दुखी आहेत. सर्व पीडित परिवारांच्या दुखात संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. ज्या कुटुंबातील अधिक इलाज चालू आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला मुलगा गमावला, कुणी भाऊ गमावला, कुणी जीवनसाथी गमावला आहे. कुणी बांगला बोलत होतं. कोणी कन्नड बोलत होतं. कोणी मराठी, कोणी ओडिया, कुणी गुजराती, तर कुणी बिहारचा लाल होता. आज त्यांच्या मृत्यूवर कारगिल ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दुख एक सारखं आहे, ते देखील मोदी म्हणाले.
भाषण सुरू करण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी २२ एप्रिल रोजी प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लोकांना काही क्षण मौन पाळण्याची विनंती केली. ते म्हणाले की आज पंचायती राज दिन आहे. संपूर्ण देश मिथिला आणि बिहारशी जोडलेला आहे. आज बिहारमध्ये विकासाशी संबंधित अनेक प्रकल्प सुरू झाले आहेत. या प्रकल्पांमध्ये हजारो कोटी रुपये गुंतवले गेले आहेत, अशी माहिती मोदींनी दिली.