पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत गाडीला स्टिकर नसल्याच्या कारणावरून सुरक्षारक्षकांकडून तरुणाला बेदम मारहाण

236

पुणे: पुण्यातील नांदेड सिटी सारख्या उच्चभ्रू सोसोयटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडीला स्टिकर नसल्याच्या कारणावरून सुरक्षारक्षकांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. नांदेड सिटीतील मधुवंती सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाला शिवीगाळ करण्यात आली, त्यानंतर त्यांच्या मुलाने जाब विचारल्यावर त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी आणि अश्विनी नामक महिलेवर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 42 वर्षीय महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

मंगळवारी म्हणजेच ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४. ३० वाजता हि घटना घडली. नांदेड सिटी भागातील मधुवंती सोसायटीमधून सुरक्षारक्षकांचा हा मुजोरीपणा समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या महिलेने हि तक्रार नोंदवली आहे त्या आपल्या पती आणि दोन मुलांसह नांदेड सिटीमध्ये असलेल्या मधुवंती सोसायटीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून राहतात. त्यांचे पती रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 4.30 वाजता फिर्यादी यांचे पती घरी जाण्यासाठी त्यांच्या मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले. त्याठिकाणी नांदेड सिटीचे सिक्युरिटी गार्ड यांनी यांच्या पतीच्या गाडीला सोसायटीचे स्टिकर नसल्याने थांबवून ठेवले. तेव्हा गेटवर कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक वाद घालून अरेरावीची भाषा करत होते. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा पुढे सरसावला तर त्याचे सुद्धा त्याठिकाणी जमा झालेल्या सुरक्षा रक्षकांशी वाद झाले. या भांडणामध्ये 8-10 सुरक्षा रक्षकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. संबंधित कुटुंबीयांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

या संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काहीजण एका तरूणाला मारहाण करताना दिसत आहेत. तर एक महिला त्या तरूणाला त्या मारहाणीपासून वाचवण्याचा आणि मारहाण करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. जवळपास ८ ते १० सुरक्षारक्षक एका तरुणाला मारहाण करत आहेत हे कितपत योग्य आहे याबाबत आता परिसरातील नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.