पाणी साचल्याने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत होण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

99

पुणे : मागील काही वर्षात शहरात कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचा नवीन ट्रेंड दिसून येत असून या पार्श्वभूमीवर पूरस्थिती आणि पुणेकरांना होणारा संभाव्य त्रास टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाला शुक्रवारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बैठक घेत निर्देश दिले. मान्सूनपूर्व कामे वेगाने आणि दर्जेदार करावीत आणि मान्सूनपूर्व कामासाठी नियुक्त केलेले ठेकेदार रिझल्ट देत नसतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकावे. तसेच ठेकेदार किंवा अधिकारी जे जबाबदार असतील, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशीही सूचना यावेळी त्यांनी केली. शिवाय पाणी साचल्याने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत होण्याचा प्रकारही खपवून घेतला जाणार नाहीत, हेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या मान्सूनपूर्व आणि नालेसफाईच्या कामाचा आढावा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मोहोळ यांनी घेतला. यावेळी आमदार भीमरावअण्णा तापकीर, आमदार हेमंत रासने, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

या बैठकीत मोहोळ यांनी पुढील महत्त्वाचे निर्देश दिले : –

१. चेंबर साफसफाई, अतिक्रमण काढणे, नाले रुंदीकरण आदी कामाचा आढावा घेण्यात आला. पावसाने कुठे पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, त्या जागेवर उपाययोजना करण्याचे सूचना मनपा प्रशासनाला दिल्या आहे.

२. पुण्यात ८७५ किलोमीटरचे एकूण नाले आहे. त्याबाबत सफाई तपासणी मनपाकडून करण्यात येत आहे. पावसाळापूर्व कामात सुसूत्रता येण्यासाठी सर्व विभागाकडून एकत्रित काम केले जाईल.

३. नालेसफाईचे यंदा २३ टेंडर मनपाने काढली असून पावसाळी पाण्याच्या लाईन टाकण्याच्या कामाबाबत १५ टेंडर काढून कामे करण्यात येत आहे. जे ठेकेदार कामाची निविदा घेऊन प्रत्यक्ष काम करत नाही, अशा तक्रारी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. यापुढे अशी गोष्ट कुठे दिसल्यास संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले जाईल. शिवाय ठेकेदार किंवा अधिकारी दोषी असतील, तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे.

४. पुण्यात आधी ११७ क्रॉनिक स्पॉट होते. त्यानंतर २२ गावे समाविष्ट झाल्यावर आता ही संख्या २०१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ११७ स्पॉटचे काम पूर्ण झाले आहे. त्याजागी नालेसफाई झाली असून उर्वरित ८४ जागांवर काम सुरू आहे. ती कामे पावसाळापूर्व पूर्ण होतील. इतर जे ३९ स्पॉट कामे यंदा पूर्ण होऊ शकणार नाही, त्याठिकाणी तात्पुरते उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांचे हाल होऊ नये, याची दखल प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना मनपाला दिली आहे.

५. सन २०१९ मध्ये आंबील ओढा येथे पूर येऊन मोठी आपत्ती आली होती. त्यानंतर उपाययोजना काम करून कात्रज ते दत्तवाडीदरम्यान नाले दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्यात आल्याने परत काही अडचण आली नाही.

६. मान्सूनपूर्व कामाचा वॉर्ड निहाय रिपोर्ट करून त्याचा एकत्रित अहवाल करण्याच्या सूचना दिल्या आहे. प्रत्येक जागी कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यास देखील सांगितली आहे. जे नेमून दिलेली कामे करत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

७. मनपाने अतिक्रमणबाबत कडक कारवाई करावी.

८. पुणे शहरासाठी राज्य सरकारला केंद्राकडून जो निधी मंजूर होऊन आलेला आहे, तो मनपाला मिळण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील.

९. आपत्ती व्यवस्थापन विभागाचा आढावा घेत सज्जतेसंदर्भात सूचित केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.