मोशी येथील टोलनाक्यालापासून टोलमुक्ती; आजपासून टोलनाका बंद

9

भोसरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवर असणारा मोशीतील टोल नाका आजपासून बंद होणार आहे. या टोल नाक्याची मुदत संपल्यामुळे शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून या टोलची टोल वसूली बंद करण्यात आली आहे. मोशीतील टोलनाका बंद झाल्यामुळे वाहन चालकांना दिसाला मिळाला आहे. जुन्नर, खेड, अंबेगाव, आदी ग्रामीण भागातून शहराकडे आणि पिंपरी-चिंचवड, पुणे शहराकडून चाकण औद्यागिक परिसराकडे जाणाऱ्या वाहनचालकांना टोल भरण्यासाठी थांबावे लागत होते.

टोल वसुली करणाऱ्या आयआरबी कंपनीने तिथे फलक लावला आहे. सर्व वाहनधारकांना कळविण्यात येते की भारतीय राजपत्र (स 1305 गुरुवार 15 डिसेंबर  20 नुसार मोशी व चांडोली (राजगुरूनगर) या प्रकल्पाची  8 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 12 नंतर समाप्त होत आहे. त्यामुळे मेसर्स ए टी आर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (आय आर बी) कडून पथकर वसुली बंद करण्यात आली आहे. याची नोंद घ्यावी, असा सूचना फलक आयआरबी कंपनीने टोलनाक्यावर लावला आहे. टोल वसुली बंद झाल्याने वाहतूक कोंडी होत नाही. वाहने सुसाट जात आहेत. टोल बंद झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.

तसेच औद्योगिक परिसरातील मालाची वाहतूक करणारी जड वाहने या मार्गावरुन जात होती. वाहनांची मोठी वर्दळ होती, त्यामुळे टोलनाक्यावर मोठ्याप्रमाणात गर्दी होत होती. त्यामुळे आता टोल बंद झाल्यामुळे ही गर्दी कमी होणार आहे. तसेच मोशीतील टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागत होत्या, त्यामुळे रांगेमध्ये बराच वेळ थांबावे लागत असल्याने वाहनचालकांना वेळेचा आणि इंधनाचा फटका बसत होता. पण आता टोलनाक्याची मुदत संपली आहे, त्यामुळे टोल वसुली आजपासून बंद झाली आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.