आगामी पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची कोर कमिटी बैठक पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पुढील चार महिन्यात या निवडणुका घेण्यात याव्यात असे सर्वोच न्यायालयाने म्हंटले आहे. याच अनुषंगाने आज पुण्यात आगामी पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची कोर कमिटी बैठक पुणे शहराध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस भवन पुणे येथे संपन्न झाली.
आगामी महानगरपालिका निवडणुकी संदर्भात प्रामुख्याने आघाडी बाबत शहरातील सद्यपरिस्थिती, पक्षाची शहरातील संघटनात्मक बांधणी यांसह वेगवेगळ्या विषयांवर या दरम्यान चर्चा झाली.
या बैठकीसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या ( शरदचंद्र पवार ) माजी खासदार वंदनाताई चव्हाण, माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे, माजी आमदार जयदेव गायकवाड, आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार कमल ढोले पाटील, नेते अंकुशअण्णा काकडे, रवींद्र माळवदकर, विशाल तांबे ,अश्विनी कदम, श्रीकांत पाटील,सचिन दोडके, भगवानराव साळुंखे ,डॉ.सुनील जगताप, पंडित कांबळे, प्रकाश म्हस्के आदी नेते तथा पदाधिकारी उपस्थित होते.