सोलापूरमध्ये दैनिक दिव्य मराठीच्या वतीने “एज्युकेशन फेअर २०२५” या प्रदर्शनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट

सोलापूर : सोलापूरमध्ये दैनिक दिव्य मराठीच्या वतीने “एज्युकेशन फेअर २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना दहावी- बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची माहिती व्हावी; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीसाठी सोलापूरमध्ये दैनिक दिव्य मराठीच्या वतीने “एज्युकेशन फेअर २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी येथील विविध स्टॉल्स ला भेट दिली. त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली.