उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने शहरातील विविध भागांत आयोजित शिबिरांना दिली भेट

18

कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय दाखले सहज उपलब्ध व्हावेत यासाठी भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने शहरातील विविध भागांत मोफत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी लक्ष्मीपुरी मंडल येथील शिबिराला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन तेथील उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना जनसेवेचा कानमंत्र दिला.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या शिबिरांमध्ये उत्पन्न, रहिवासी दाखले, आधार अपडेट, डिजिटल रेशनकार्ड यांसारखी कागदपत्रे मोफत मिळणार असून ३ जून ते १४ जून या दरम्यान २५ ठिकाणी हे शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का.सदस्य राहूल चिकोडे, जिल्हाध्यक्ष विशाल जाधव, विशाल शिराळकर, धनश्री तोडकर, आप्पा लाड, अतुल चव्हाण, संतोष माळी, विजय दरवान, अवधूत भाट्ये, रश्मी साळोखे, विजयमाला जाधव, आसावरी जुगदार, महेश यादव, मंगला निपाणीकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.