ग्रंथालयांना 40 टक्के अनुदान वाढ करण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल नामदार चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ यांचे वतीने करण्यात आला सत्कार

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ व करवीर नगर वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कृतज्ञता सत्कार व संवाद सोहळा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यासाठी पाटील यांनी कार्यक्रमात केलेल्या सत्काराबद्दल संयोजकांचे आभार मानले.
करवीर नगर वाचन मंदिर च्या 175 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात नामदार चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ यांचे वतीने ग्रंथालयांना 40 टक्के अनुदान वाढ करण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सत्कार करण्यात आला .यावेळी करवीर नगर वाचन मंदिराच्या “ शतकामृत स्मरणगाथा “या विशेष अंकाचे देखील पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले .
करवीर नगर वाचन मंदिराच्या शतकोत्तर अमृत महोत्सवा निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी एकत्र आले आणि ग्रंथालय चळवळीच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण विचारमंथन यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी कोल्हापूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील, राज्य ग्रंथ निवड समितीचे अध्यक्ष अभिराम भडकमकर, पुणे विभागाच्या ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.