महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्वयम्’ उपक्रमाच्या पहिल्या स्वतंत्र शॉपीचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर : कोल्हापूरमधील शुक्रवार पेठ परिसरात महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्वयम्’ उपक्रमाच्या पहिल्या स्वतंत्र शॉपीचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पाटील यांनी स्वयम् उपक्रमाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारत उन्नतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सर्व महिलांचे मनापासून कौतुक केले आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम केवळ व्यवसायाची संधी नसून महिलांच्या आत्मविश्वासाचा आणि सशक्तीकरणाचा नवा अध्याय असल्याचे यावेळी पाटील यांनी म्हटले.
या प्रसंगी सौ. अंजली पाटील, सौ. वृंदा सलगर, नितीन कामत, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, बाळासाहेब यादव तसेच ‘स्वयम्’ संस्थेच्या महिला उत्साहाने उपस्थित होत्या.