दयानंद महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना “कमवा आणि शिका” योजनेतून सर्वतोपरी मदत करणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सोलापूर येथील दयानंद इन्स्टिट्यूटला भेट दिली. येथील विद्यार्थ्यांशी चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या बहुश्रुततेवर भर दिला आहे. विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञानपरंपरा देण्यासाठी मोदीजींचा सतत प्रयत्न असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता जोपासली जाणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने एक पाळीव प्राणी पाळावा, असा विशेष आग्रह यावेळी त्यांनी मांडला.
स्त्रियांच्या सक्षमी करणावर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षणात अधिक संधी मिळाव्यात यासाठी शासनाकडून मोफत उच्च शिक्षण उपलब्ध करून देत आहोत. यंदा अभियांत्रिकी शाखेत मुलींचे प्रमाण लक्षणीय वाढले असल्याचे सांगितले. दयानंद महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना “कमवा आणि शिका” योजनेतून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी या प्रसंगी दिली.
या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. महेश चोप्रा, मोहन डांगरे, भाजप पुणे शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, संस्थेचे प्रशासक प्रा. डॉ. व्ही. पी. उबाळे, प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर, प्रा. डॉ. एस. व्ही. शिंदे, प्रा. डॉ. बी. एच. दामजी, डॉ. श्रीमती एस. जे. गायकवाड यांच्यासह प्राचार्य, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.