उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाव्हकर कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

10

सोलापूर : सोलापूरमधील माजी जिल्हा सरकारी वकील संतोष नाव्हकर आणि यवतमाळचे जिल्हा सत्र न्यायाधीश नागेश नाव्हकर यांचे वडील विठ्ठल नाव्हकर यांना काही दिवसांपूर्वी देवाज्ञा झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज नाव्हकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन बाबांना श्रद्धांजली वाहिली आणि नाव्हकर कुटुंबियांचे सांत्वन केले.

नाव्हकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी असल्याचे पाटील यांनी म्हटले. यावेळी सोलापूरच्या भाजपा शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, मोहन डांगरे देखील उपस्थित होते.

जनसंघाचे संस्थापक सदस्य टिळक चौक येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव नारायणराव न्हावकर यांचे गुरुवारी, 11 सप्टेंबर रोजी रात्री वृध्दापकाळात निधन झाले. ते मृत्यूसमयी 89 वर्षीय होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य येथील शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सचिव, गणेशोत्सव व नवरात्र मध्यवर्ती महामंडळाचे ज्येष्ठ सदस्य म्हणूनही त्यांची ओळख आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.